आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय ई-मार्केट जीईएम पोर्टलवर विनामुल्य कार्यशाळा:अंबड एमआयडीसीतील आयमा सभागृहात शुक्रवारी आयोजन

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय ई-मार्केट असलेल्‍या जीईएम पोर्टलच्‍या माध्यमातून सरकारी संस्‍थांसोबत उद्योग, व्‍यवसायाच्‍या संधी उपलब्‍ध आहेत. या संधींची माहिती देण्यासह प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी 'जीईएम: संधी उद्योगांसाठी' या विषयावर विनामूल्‍य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

शुक्रवारी १६ डिसेंबररोजी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी एक वाजेदरम्‍यान अंबड एमआयडीसीतील 'आयमा'च्‍या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. आयमा, विझ्डम एक्‍ट्रॉ कन्‍सल्‍टंट, जिओजित फायनान्‍शियल सर्व्हीसेस, दी नॅशनल स्‍मॉल इंडस्‍ट्रीज्‌ कॉर्पोरेशन आणि स्‍वयंशक्‍ती स्‍त्री उद्यमी फाउंडेशन यांच्‍यातर्फे ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे.

उत्‍पादक, सेवा पुरवठादार, वस्‍तू पुरवठादार यांच्‍यासाठी ही कार्यशाळा उपयुक्‍त ठरणार आहे. शासकीय संस्था, विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील विविध प्रकल्‍प यांना आवश्यकता असलेली उत्पादने किंवा सेवांची खरेदी, नोंदणी जीईएमच्‍या माध्यमातून बंधनकारक केलेली आहे. या माध्यमातून २५ टक्‍के खरेदी सूक्ष्म आणि लघु उद्योगांकडून बंधनकारक केलेली आहे. ४ टक्‍के एससी, एसटी उद्योगांकडून खरेदी करणे तर ३ टक्‍के खरेदी महिला उद्योगांकडून करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारच्या विविध संस्थेतील, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्‍यांना आवश्यक असलेल्‍या वस्तू वा सेवा पुरवणे आणि त्यामाध्यमातून, उद्योगास नवीन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने सरकारच्या जीईएम पोर्टलचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याबाबत माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे.

अधिक माहितीसाठी यांच्याशी साधा संपर्क

कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी निखिलेश काळे यांच्‍याशी 95799 32476 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

बातम्या आणखी आहेत...