आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त; सत्यशोधक प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिरात 200 जणांची मोफत तपासणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (दि.५) श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने मेरी, म्हसरूळ परिसरातील नागरिकांसाठी दिंडोरी रोडवरील ओम गुरुदेव सभागृहात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २०० नागरिकांची मोफफफत तपासणी करण्यात आली. या महाआरोग्य शिबिरात हॉ. प्रमोद खैरनार, हॉ. आशिष जाधव, हॉ. अतुल अहिरराव व रामोळे आय हॉस्पिटलचे तज्ञांनी नागरिकांची तपासणी केली.

महाशिबिर चालू असताना प्रतिष्ठानतर्फे पर्यावरणपूरक २० कडूनिंबाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. सत्यशोधक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दीपक मंडलिक यांच्यासह शिवदास तिडके, महिला अध्यक्षा राजश्री गायकवाड, विजय असोलकर, भगवान पाटील, भारत राजकुळे, राजेंद्र बागुल, प्रदीप अहिरे, रवी हिरवे, वंदना बागुल, पूजा वाघचौरे, प्रतिभा गांगुर्डे, अनिता पाटील, वैशाली गोवर्धने, पल्लवी मोरे, दीप्ती हिरवे यांच्यासह प्रतिष्ठानच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...