आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या महायुद्धाच्या काळात अवघ्या वर्षभरासाठी ब्रिटिशांनी काढलेली जगातील एकमेव अडीच रुपयांची नाेट, जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच १३४८ मध्ये चलनात असलेली चीनमधील नाेट, भारतातील पहिल्या नाेटबंदीत बंद झालेली एक हजाराची नाेट इतकेच नाही तर चंद्रगुप्त मौर्यांच्या राज्यातील नाण्यांपासून गुलशनाबाद असलेल्या नाशिकच्या त्या काळी टाकसाळीत तयार झालेले नाणे असे देश विदेशातील पुरातन, दुर्मिळ नाणी, नाेटा आणि शस्त्रात्रांच्या खजिन्यात नाशिककर अक्षरश: हरवले आहेत.
कलेक्टर्स साेसायटी आॅफ न्यूमिसमॅटिक अँड रेअर आयटेमसकडून ‘रेअर फेअर’चे आयाेजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन इंदिरानगर बाेगद्याजवळील मनाेहर गार्डन येथे सुरू झाले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी पाेलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पगार, उपाध्यक्ष अॅड.राजेश जुन्नरे, सचिव सुभाष पगार, सहसचिव राहुल कुलकर्णी यांसह कमलवाडा म्युझियमचे अनंत धामणे, नाेटांचे संग्राहक उमेश वरखेडे, विनयकुमार चुंभळे, अनीश मेहता यांच्यासह मुंबइ रिजनचे पाेस्टमास्तर जनरल उपस्थित हाेते.
हे प्रदर्शन रविवारपर्यंत दरराेज सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असेल. प्रदर्शनात, पेशवे, इंदूरचे हाेळकर, बडाेद्याचे गायकवाड, उदयपूरचे महाराणा प्रताप चाैहान, बिकानेर, जयपूर, हैदराबाद, अहमदनगरचा निजाम तसेच कच्छ राज्य, जाबरा, टाॅक देवास, टिपू सुलतान, त्रावणकाेर यांसारख्या अनेक संस्थानांची नाणी या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. राष्ट्रीय स्तरावरील देशी व विदेशी दुर्मिळ नाेटा, नाणी, पाेस्ट तिकिटे, दुर्मिळ वस्तू, शिवकालीन शस्त्रात्रे यांचा समावेश या प्रदर्शनात असून मुले अक्षरश: यात हरखून जात आहेत.
नाणी, नाेटांची खरेदी-विक्रीही : विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करणारे नाेंदणीकृत व मान्यताप्राप्त व्यापारी, पुरातत्त्व विभाग व भारत सरकार यांच्याकडून परवानाप्राप्त लिलाव कंपन्या, पाेस्ट, भारतीय रिझर्व्ह बँक यांची करन्सी चेस्ट, मुंबई टाकसाळ यांचे स्टाॅल्स येथे असल्यामुळे नागरिकांना त्यांचा संग्रह वाढवण्यासाठी मदत हाेत आहे.
फाळणीत पाकिस्तानला दिलेली नाेट चर्चेत
प्रदर्शनात १९१६ ते २०१५ पर्यंतच्या १०० वर्षांतील १ रुपयाच्या ३० वेगवेगळ्या वित्त सचिवांच्या स्वाक्षरी असलेल्या नाेटा तसेच भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी भारताने पाकिस्तानला दिलेल्या ५१ काेटींमधील एक रुपयाची भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार अशी छपाई असलेली नाेट उमेश वरखेडे यांच्या संग्रहात आहे.
शिवकालीन नाण्यांची विशेष विचारणा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील एक हजारपेक्षा अधिक तांब्याच्या नाण्यांचा संग्रह मुंबइच्या अझर शेख यांच्याकडून येथे मांडण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या काळातील नाण्यांची विशेष विचारणा येथे भेट देणाऱ्यांकडून हाेत आहे.
चंद्रगुप्ताच्या काळातील साेन्याचे नाणे लक्षवेधी
चंद्रगुप्त माैर्य यांच्या काळातील चलनात असलेले ८ ग्रॅम वजनाचे आणि एका बाजूने शंकर तर दुसऱ्या बाजूने देवी लक्ष्मी अंकित असलेले साेन्याचे नाणे, मुघल शासकांच्या काळातील नाणी तसेच ब्रिटिशांनी भारतात राज्य करताना काढलेले पहिले साेन्याचे दहा ग्रॅम वजनाचे नाणे लक्षवेधी ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.