आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:जयंतीनिमित्त संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती तसेच माजी आ. जयचंद कासलीवाल यांची १५ वी जयंती यानिमित्त भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रा. स्व. संघाचे विजयराव कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, सोनल दगडे-कासलीवाल व मांगीतुगी सिद्धक्षेत्र अध्यक्ष सुमेर काळे यांनी विचार व्यक्त केले. संताजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदमरे या गावी झाला. त्यांचे आई-वडील विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजी महाराजांवर धार्मिक संस्कार झाले होते.

संत तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकऱ्यापैकी संताजी महाराज हे एक होते. संताजी महाराज यांना संत तुकारामांचे अभंग मुखोद्गत होते, असे मान्यवरांनी आपले विचार मांडतांना सांगितले. तसेच आ. जयचंद कासलीवाल यांनी संघटन कौशल्य आणि लोकसंपर्क या जोरावर त्यांनी भाजपचे विचार ग्रामीण भागात रुजविण्याच्या प्रयत्न केला, असे मान्यवरांनी मनाेगतात म्हटले. याप्रसंगी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव रेहान मेमण, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, जगन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, रोहिणी नायडू आदींसह कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...