आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामकाे परिचारिका महाविद्यालयात मार्गदर्शन‎:निसर्गाेपचारासह याेगाकडे‎ निराेगी आराेग्यासाठी कल‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजारांच्या वाढत्या प्रभावाच्या‎ पार्श्वभूमीवर निरोगी आरोग्यासाठी‎ निसर्गोपचार आणि योगसाधनेकडे‎ नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात‎ वाढत असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन‎ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे‎ प्रति कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ‎ यांनी केले.‎ पेठरोडवरील नामको परिचारिका‎ महाविद्यालयाच्या प्रांगणात ए.एन.एम.‎ अभ्यासक्रमाचा १४ वा आणि‎ जी.एन.एम. अभ्यासक्रमाचा ११ वा‎ दीप प्रज्वलन सोहळा आयोजित‎ करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख‎ पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ‎ बोलत होते. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी नामको चॅरिटेबल‎ ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी‎ होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्लास्टिक‎ सर्जन डॉ. राजेंद्र नेहते, संस्थेचे सचिव‎ शशिकांत पारख यांच्यासह नामको‎ हॉस्पिटलच्या मेट्रन समीक्षा काशीद,‎ झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या मेट्रन‎ जयश्री वैशंपायन, इंदिरा गांधी‎ हॉस्पिटलच्या मेट्रन रोहिणी जोशी‎ उपस्थित होते.‎

उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा.‎ डॉ. निकुंभ म्हणाले की, बदलत्या‎ जीवनशैलीमुळे आजारांच्या‎ प्रमाणातही वाढ झाली आहे.‎ अत्याधुनिक उपचारपद्धती आणि‎ प्रभावी औषधांमुळे निदान झालेल्या‎ आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य‎ आहे. मात्र, आजार होऊच नयेत‎ यादृष्टीनेही जागतिक पातळीवर‎ मोठ्या प्रमाणावर विचारमंथन सुरू‎ आहे. यात रासायनिक घटक टाळून‎ अधिकाधिक नैसर्गिक‎ आहारपद्धतीचा स्विकार याचा विचार‎ हाेत आहे.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा‎ तेलधुणे, प्रा. प्रीती देवरुखकर यांनी‎ केले. प्रा. एकता शिंदे यांनी आभार‎ मानले. यावेळी विश्वस्त चंद्रकांत‎ पारख, , हॉस्पिटलचे सीईओ डॉ.‎ लक्ष्मीकांत पाठक, वैद्यकीय‎ अधिक्षीका डॉ. विशाखा‎ जहागिरदार यांच्यासह शिक्षक,‎ शिक्षिका, कर्मचारी मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...