आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव:यशवंतराव महाराज यात्रोत्सव सोमवारपासून

सटाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३५ व्या पुण्यतिथी सोहळ्यास गुरुवारी (दि. १५) यशवंत लीलामृत ग्रंथाच्या पारायणाने सुरुवात झाली असून पुढील चार दिवस वाचन होईल. सोमवार (दि.१९) रोजी पहाटे चार वाजता महाराजांची महापूजा तर दुपारी तीन वाजता रथ मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सटाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी, देवस्थानच्या ट्रस्टींनी यात्रा परिसराची पाहणी केली. यात्रेकरूंना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन झाले आहे. नामदेव महाराज रातीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.१५) पासून सकाळी ८ ते ११ वाजेच्यादरम्यान मंदिरात यशवंत लीलामृत ग्रंथाचे चार दिवस पारायणाला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.१९) पहाटे चार वाजता नगरपरिषदेचे प्रशासक व प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार आहे. दुपारी तीन वाजता महाराजांच्या मंदिरापासून रथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...