आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योग दिन विशेष:सलग 26 तास 30 मिनिटे योगासन, डॉ. पटणी यांची विश्वविक्रमाला साद; योगाद्वारे विक्रमाला गवसणी घालणारे पटणी कुटुंब

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धावपळ व धकाधकीच्या जीवनात आरोग्य संवर्धनासाठी योगा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच योगाबाबत जनजागृतीसह प्रशिक्षण देण्याचे काम पटणी कुटंुबियांकडून केले जाते. विशेष म्हणजे, योगाच्या माध्यमातून पटणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी विक्रमाला गवसणी घालत शहराचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

होमओपॅथीतज्ज्ञ डॉ. पराग पटणी यांनी नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सलग २६ तास ३० मिनिटे योगा करत नव्या विश्वविक्रमाला साद घातली आहे. यापूर्वी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सलग योगासने करण्याचा अमेरिकन नागरिकांचा २४ तासांचा विक्रम होता.

मुलांचेही नेत्रदीपक यश
आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत १४ वर्षीय गीत पराग पटणीने जगातील सर्वात तरुण योगशिक्षक म्हणून आेळख निर्माण केली आहे. ग्लाेबल फेम पुरस्कार, उदयोन्मुख तरुण योग शिक्षक, ध्रुवरत्न पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला आहे. १० वर्षांची असल्यापासून ती योगा शिकवते. तिचे अनेक विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योग चॅम्पियनशिपमध्ये विजेते आणि उपविजेते झाले आहेत. आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत ४ सुवर्ण, राष्ट्रीय योग चॅम्पियनशिपमध्ये ५ सुवर्ण तर राज्य योग चॅम्पियनशिपमध्ये ९ सुवर्णपदके तिने मिळवली.

अलीकडेच तिने एका मिनिटांत ३९ योगासन करत सर्व विक्रम मोडीत काढले. तिच्या या कामगिरीच दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. याबरोबरच १४ वर्षीय आदित्य पराग पटणी यांनी यंगेस्ट एरियल स्पोर्ट‌्स ट्रेनर अशी नवी ओळख प्राप्त केली असून तीन वर्षांपासून तो मुलांना एरियल स्पोर्ट‌्सचे धड देत आहे. १ मिनिटांत १०४ पुश-अप काढत त्याने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोद केली आहे. याचबराोबर १७ वर्षीय स्मयक पराग पटणीने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केले असून यंगेस्ट एरियल योगा व एरियल स्पोर्ट‌्स ट्रेनर म्हणून पुरस्कार मिळाला.

बातम्या आणखी आहेत...