आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीचा धर्म फक्त सेेनेनेच पाळायचा का?:योगेश घोलप यांचा आमदार सरोज अहिरे यांच्या श्रेयवादावर आक्षेप

नाशिकराेड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहीतगाव, बेलतगव्हाण येथील जमिनी बालाजी संस्थानच्या तावडीतून मुक्त केल्याचा दावा देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सराेज अहिरे या करीत आहे. मात्र फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रकार आमदारांनी करू नये, असा घणाघात करत महाविकास आघाडीचा धर्म फक्त शिवसेनेनेच पाळायचा का? असा सवाल माजी आमदार योगेश घोलप यांनी उपस्थित केला आहे.

देवळाली मतदारसंघातील भविष्यातील सर्व निवडणुका शिवसेना ही स्वबळावरच लढविणार असल्याचा इशारादेखील घाेलप यांनी दिला. जमिनी मुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील पाठपुरावा केला, परंतु, राष्ट्रवादीच्या आमदार सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. घोलप परिवारातील सदस्यांना श्रेय नका देऊ मात्र ज्या शिवसैनिकांनी आणि शिवसेनेने प्रयत्न केले त्यांना तर विसरू नका, असेही घाेलप यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...