आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड औद्याेगिक वसातीतील राेहीणी इंडस्ट्रीज कंपनीचे सीईओ याेगेश माेगरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल (२४) याला नाशिकच्या गुंडा विराेधी पथकाने हरियाणातून ताब्यात घेतले. ओळख लपविण्यासाठी ताे दाढी व केस कापून जंगलात लपला हाेता. पाेलिसांचे पथक बघताच त्याने पळ काढला. मात्र, पाेलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले
मायानगरीत घातली मोहीनी
माैज मजा करण्यासाठी हरियाणातून मुंबईतआलेल्या दाेघांना मायानगरी मुंबईने माेहीनी घातली. मुंबईत फिरण्यासाठी पैश्यांची गरज असल्याने योजना आखून ते नाशिकला आले. यावेळी राेहीणी इंडस्ट्रीज कंपनीचे सीईओ याेगेश माेगरे यांची कार त्यांच्या नजरेस पडली.
योगेश मोगरेंना लुटून केला खून
रात्रीच्या वेळी घरी येताना माेगरे पान स्टाॅलवर थांबले असताना दाेघा संशयितांनी त्यांना लुटण्याच्या उद्देशाने त्यांना अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नातून त्यांनी माेगरे यांची हत्या करून पळ काढला हाेता. पाेलिसांना घटनास्थळी सापडलेल्या पिशवीत आढळलेल्या चिठ्ठीतील माेबाईल क्रमांकावरून पाेलिसांनी संशयीतांचा माग काढला हाेता.
गुन्ह्यात अल्पवयीनाचा समावेश
यातील एका अल्पवयीन संशयिताला पाेलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य संशयित फरार झाला हाेता. पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायकआयुक्त वसंत माेरे व गुन्हे शाखेचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विराेधी पथक मुख्य संशयिताच्या शाेधासाठी हरियाणात गेले व संशयिताच्या घरी पथकाने झाडाझडतीही घेतली. मात्र ताे तेथे सापडला नव्हता.
हरीयानातील जंगलातून बेड्या
पथकातील सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर माेहिते, हवालदार डि.के .पवार, गुलाब साेनार, प्रदीप ठाकरे यांनी स्थानिक पाेलिसांच्या मदतीने मुख्य संशयीत अजितसिंग लठवाल यास चिराणा, ता. गाेहाणा जिल्हा साेनीपत येथून रविवारी रात्री (दि.२) जंगलात पाठलाग करून ताब्यात घेतले असून त्याला घेऊन पाेलिस नाशिककडे रवाना झालेआहेत. गुन्हे शाखा युनिय २ चे पोलीस निरीक्षक आनंद वाघ याप्रकरणाचा तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.