आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा आरजे सीजन -2:यंग भास्कर आणि 104.2 माय एफएम छोट्या आरजेंच्या शोधात

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजची पिढी अनेक टॅलेंटने भरलेली आहे. कुणी स्टोरी टेलिंगमध्ये पुढे आहे तर कुणी कविता करण्यामध्ये, कुणाला मिमिक्रीची आवड आहे तर कुणाला विनोद करून हसवण्याची. अशाच मुलांना रेडिआेवर आपली कला सादर करण्यासाठी १०४.२ माय एफएम घेऊन आले आहे ‘छोटा आरजे’. यात निवड झालेल्या मुलांना मिळणार आहे आरजेंप्रमाणे शो होस्ट करण्याची संधी.

मागील वर्षी ‘छोटा आरजे सीजन -२’ ला ही शहरातील मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या प्रमाणात मुलांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. शेवटी निवड झालेल्या मुलांनी शो होस्ट करून आपल्या शाळेत आणि सोसायटीमध्ये आपले नाव गाजवले होते. यंदा परत एकदा या वर्षीच्या शोसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. रजिस्ट्रेशनसाठी मुलांचे वयोगट ७ ते १२ वर्षे आहे. जर तुमच्या मुलांमध्ये देखील आपल्या गोष्टींना एका वेगळ्या प्रकारे सादर करण्याची कला आहे तर त्यांची गोष्ट, कविता, मिमिक्री किंवा विनोदाचा एक मिनिटाचा व्हिडिअो रेकॉर्डिंग आणि त्यांची पूर्ण माहिती आम्हाला ८४४ ६०५ १०४२ या नंबरवर व्हाॅट्सअॅप करा किंवा आरजे शुभी, आरजे वैष्णवी आणि आरजे अपूर्व यांच्या फेसबुक अथवा इन्स्टाग्राम पेजवरही पाठवू शकता. अधिक माहितीसाठी ऐकत रहा १०४.२ माय एफएफ आणि वाचत रहा दैनिक दिव्य मराठी.

बातम्या आणखी आहेत...