आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये पोलिसांची धडक कारवाई:गावठी कट्टासह एका तरुणाला घेतले ताब्यात; जबरी चोरी करणारे चौघेही ताब्यात

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड येथील देवळालीगाव राजवाडा परिसरात एका तरुणाकडून जीवंत काडतुसासह गावठी कट्टा, कोयता जप्त केला आहे. तर जबरी चोरी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात नाशिकरोड पोलिस यशस्वी ठरले आहेत.

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, पोलिस नाईक विशाल पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली होती, की देवळालीगाव येथील पाटील गँरेज मागे रहाणारा शैलेश गोपीचंद सहारे हा राजवाडा परिसरातील तक्षाशिला शाळेजवळ संशयितरित्या फिरत असून त्याच्याकडे बंदुक आहे. या माहितीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने साधा वेशात जाऊन सापळा रचला, पण पोलिस आल्याचे सुगावा लागताच तो पळ काढू लागला. परंतू साध्या वेशातील पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ गावठी कट्टा, जीवंत काडतूस मिळून आले. तर नाशिकरोड येथे एका इसमावर हल्ला करुन पळालेले संशयित आरोपी प्रवण प्रदिप इंगळे, शाहिद शौकत सैय्यद, यज्ञेश उर्फ मँडी ज्ञानेश्वर शिंदे आणि कलाम मन्सुरी हे चौघेजण फिरत असल्याचे गोपीनिय माहिती विशाल पाटील यांना मिळाली होती, यावेळी गणेश न्ह्यायदे, राजु पाचोरकर, जयेश गांगुर्डे, अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विशाल पाटील, अवि देवरे, संदिप बागल, विष्णु गोसावी, कुंदन राठोड, राकेश बोडके, श्री जाधव, श्री कोकाटे यांनी तात्काळ जावुन सबंधितांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता,एक मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेतला.

बातम्या आणखी आहेत...