आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक प्रदूषणाविरोधात लढण्यासाठी 'यंग इंडियन्स' सज्ज:थिंक आउटसाईड- ट्रॅश रिसायकल उपक्रमाला प्रारंभ

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीची यंग इंडियन्स ही युवा आघाडी असून, त्यांच्या नाशिक चॅप्टरतर्फे केवळ कचऱ्याच्या विचारातून बाहेर येत त्याची पुनर्प्रक्रिया करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मधुन निर्माण हाेणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी शहरातील उपाहारगृहांना प्लास्टिक जमा करण्यासाठी स्वतंत्र डस्टबिन देत ही मोहीम सुरू करण्यात आली असून त्याअंगर्तगत 100 रेस्टॉरंट्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, या अनाेख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चॅप्टरचे सहअध्यक्ष वेदांत राठी, क्लायमेट चेंज अध्यक्ष रोहन भिंगे, क्लायमेट चेंज सहअध्यक्ष हर्षित पहाडे, साहिल न्याहारकर आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील कचरा

यंग इंडियन्सने शहरातील अनेक रेस्टॉरंट्सना त्यांच्या प्लास्टिक कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक रेस्टॉरंट्समधून कचरा गोळा केला जाईल. त्यावर एकत्रितरित्या प्रक्रिया केली जाईल. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपहारग्रहांमधून प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.

प्रदूषण कमी होईल

नाशिककरांनी या उपक्रमात हातभार लावावा, आम्ही प्रक्रिया करणाऱ्या कंपनीसोबत संपर्क साधण्यास आणि आपल्याकडून वैयक्तिकरित्या होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत करू शकतो. घरातील कचऱ्याचे विलगीकरण करणे आणि त्याचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खत कंपन्यांशी करार करणे हा आमचा पुढचा उपक्रम असल्याचे नाशिक चॅप्टरचे क्लायमेट चेंज अध्यक्ष रोहन भिंगे यांनी सांगितले.

पुर्नवापरातून राेजगार निर्मीती

भारतातील प्लॅस्टिक कचरा वर्ष 2017 च्या तुलनेत 2 हजार पर्यंतचे वार्षिक 1.78 कोटी टन इतका वाढला आहे. हा कचरा समुद्र, महासागर, नद्या, शेतजमिनीवर विपरित परिणाम करत आहे. प्लास्टिक रिसायकल करून त्याचा वापर रस्ते बनविण्यासाठी, कापड उद्योगात व इतरही ठिकाणी केला जात आहे. यातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीचे आमचे ध्येय असल्याचे सहअध्यक्ष वेदांत राठी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...