आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारमंथन:धार्मिक तेढ निर्माण करून तरुणांना भरकटवले जाते; नाशिकधील कार्यकर्ता शिबिरात मान्यवरांचा सूर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून तरुणांना भरकटवले जाते. मात्र, शिबिरातून रचनात्मक पद्धतीने संघटन कौशल्य मजबूत होते. त्यामुळे विद्यार्थी युवकांना मार्गदर्शनातून पुढे आणणे महत्वाचे ठरते, असा सूर महाराष्ट्र तरुण कार्यकर्ता बांधणी शिबिरात उमटला.

'ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन' व एआयवायएफ अर्थात 'ऑल इंडिया युथ फेडरेशन' यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यकर्ता चार दिवसीय निवासी शिबिर चिखलवाडी, नाशिक येथे पार पडत आहे. यावेळी पहिल्या दिवशी अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष लांडे व प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. राम बाहेती, राजू देसले, राजू नाईक, डॉ. युगल रायलू, विराज देवांग उपस्थित होते. तल्हा, जयंत विजयपुष्प, प्राजक्ता कापडणे, हर्षाली देवरे, कैवल्य चंद्रात्रे, कैफ, अवेश लोहिया, प्रज्ञा साळवे व दीक्षा साळवे शिबिरासाठी परिश्रम करत आहेत.

कार्यकर्त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास

राजू देसले म्हणाले की, कार्ल मार्क्सचा विचार व ह्याच विचारानी त्यांनी AISF चा सक्रीय कार्यकर्ता म्हणून 1991 पासून केलेले कार्य आणि विचार याचा प्राधान्याने अभ्यास करायला हवा. शिबिरातून संघटन कौशल्ये तर मजबूत होतीलच, परंतु कार्यकर्त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साध्य होत असतो. हे अतिशय महत्वाचे व पुढे स्वतःच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतो. डॉ. युगल रायलू म्हणाले की, ईश्वरवाद व पदार्थवाद यावर अतिशय रचनात्मक पद्धतीने संवाद होण्याची गरज आहे. पदार्थवाद हा कसा विज्ञानवाद व पर्यायाने निरीश्वरवाद यावर अवलंबून आहे तर ईश्वरवाद हा कल्पना व कर्मकांड यावर अवलंबून आहे.

वैचारिक वारसा जपा

डॉ. राम बाहेती म्हणाले की, कार्ल मार्क्स व शहीद भगतसिंग यांचे विचार एआयएसएफचे मूळ आहे. आजच्या घडीला-जेव्हा तरुण वर्गाला धार्मिक व जातीय तेढ वाढवून भडकवल्या व भरकटवल्या जात आहे. तेव्हा तरुण वर्गाने नवीन काहीतरी शिकणे ते अंमलात आणणे हे स्वागतार्ह व गरजेचे आहे. वैचारिक वारसा असा पुढे जाणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...