आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअपवरुन वाद:व्हॉट्सअप ग्रुपमध्ये न विचारता घेतल्याने अल्पवयीन मुलांचा तरुणावर हल्ला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटीच्या विजयनगर परिसरातील नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये न विचारता समाविष्ट केल्याच्या रागातून दोघा अल्पवयीन मुलांनी ग्रुप अॅडमिन भेटला नाही म्हणून त्याच्या मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. ४) देवी मंदिर ग्राउंड येथे सायंकाळी ४.३० वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सायंकाळी ४.३० वाजता दीपक काशीनाथ डावरे (२२) हा तरुण देवी मंदिर मैदानावर क्रिकेट खेळत असताना संशयित दोन अल्पवयीन मुले मैदानावर आली. त्यांनी दीपक डावरेसोबत वाद घातला. शिवीगाळ करत एकाने सोबत आणलेल्या कोयत्याने दीपकच्या पोटावर वार केल्याने त्याचा कोथळा बाहेर आला. इतर मित्रांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रेयसीने काही दिवसांपासून बोलणे बंद केल्याच्या रागातून प्रियकराने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकरोडच्या देवी चाैकात उघडकीस आली. युवतीच्या तक्रारीनुसार संशयित प्रियकर शुभम अरुण घोलप (रा. जेलरोड) याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, पंचक, जेलरोड परिसरात राहणारी युवती नाशिकरोडच्या देवी चौक येथील एका सराफ दुकानात नोकरी करते. सहा वर्षांपासून संशयित शुभमसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र, काही दिवसांपासून प्रेयसीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून संशयित युवती कामास असलेल्या अलंकार दुकानात आला. दुकानातच शिवीगाळ करत, मारहाण करण्यास सुरुवात केली. युवतीने झटापट केली असता संशयिताने हातातील कटरने युवतीच्या हातावर वार करत जखमी केले. रक्तस्त्राव झाल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी धाव घेतली. संशयिताचा शोध घेत त्याला परिसरात अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हल्ला करणारे संशयित ताब्यात ^दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांची चौकशी केली असता किरकोळ कारणातून हा हल्ला झाला आहे. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. - डाॅ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी

बातम्या आणखी आहेत...