आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याला दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण:तिघांची तरुणाला काठीने बेदम मारहाण, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाळीव कुत्र्याला धक्का लागल्याच्या कारणातून तीन तरुणांनी दुचाकी चालकाचा पाठलाग करत त्याला पकडून बेदमा मारहाण केल्याचा प्रकार हिरावाडी परिसरातील पाटाच्या पुढे उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात 3 अनोळखी तरुणांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि विश्वजीत शिंदे (रा. आपला महाराष्ट्र काॅलनी, हिरावाडी रोड पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिरावाडी रोडने दुचाकीहून घरी परत येत होते. आपला महाराष्ट्र काॅलनीकडे ते दुचाकीने डावीकडे वळण घेताना मागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील तिघांनी शिंदे यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावत थांबण्याचा इशारा दिला.

दुचाकी थांबवली असता दुचाकीवरील दोघांनी खाली उतरण्यास सांगीतले. इतक्या जोरात गाडी चालवतो का? कुत्र्याला काही झाले असते तर असे बोलून शिंदे याला गाडीवरून खाली उतरवण्यास सांगत तीघांनी काठीने बेदम मारहाण केली. आलेल्या दुचाकीहून तीघे जण आडगाव नाक्याच्या दिशेने पळून गेले. झटापटीमध्ये शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली. निरिक्षक युवराज पत्की यांच्या सूचनेनुसार तपास सुरु आहे.

यापूर्वीही वाद

हिरावाडी परिसरात मोकाट कुत्र्यांना एक महिला व तिची मुलगी बिस्किटे खाऊ घालत असल्याने सार्वजनिक रस्त्यावर मोकाट कुत्र्यांंची संख्या वाढली आहे. एका महिलेला कुत्र्याने चावा घेतला होता. महिलेने दोघींना जाब विचारला असता तीने खोटा आरोप करत मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत केली होती.

मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

हिरावाडी परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाळीव जनावरांना चरण्यास मोकाट सोडून देणाऱ्या जनावर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी देखील बहुतांशी पशूपालक सार्वजनिक रस्त्यावर जनावरे सोडून नागरीकांच्या जीवीताला धोका निर्माण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...