आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीकडून हाेत असलेल्या चाैकशीच्या निषेधार्थ व अग्नीपथ सैन्य प्रक्रिया निर्णयाच्या विराेधात शनिवारी (दि.18) युवक काॅंग्रेसच्या वतीने आंदाेलन करण्यात आले. विशेष म्हणजे, युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी गनिमी काव्याने भाजपा कार्यालयावर आंदाेलनासाठी जात असतानाच पाेलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवून ताब्यात घेतले.
केंद्रातील भाजपा सरकारकडून ईडीच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आराेप जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केला. त्याचबरबेर केंद्र सरकारने जी अग्निपथ सैन्य भरती प्रक्रिया सुरू केली, त्यमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अन्यायाविरोधात हे आंदाेलन करण्यात आले. युवक काँग्रेस वतीने भाजपा कार्यालय येथे आंदोलनाला जात असताना पदाधिकाऱ्यांना नेहरु गार्डनच्या जवळच रस्त्यात अटक करण्यात आली.
प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत ओगले जिल्हाध्यक्ष पाटील, सरचिटणीस गाैरव पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली बेधडक आंदोलन करण्यात आले. प्रदेश सचिव राहुल दिवे, सचिव अतिषा पैठणकर, पदाधिकारी धनंजय कोठुळे, ओंकार पवार, नितेश निकम, जावेद पठाण, सलमान काझी ,अकिल कादरी, विधानसभा अध्यक्ष देवेद्र देशपांडे, जयेश सोनवणे, इम्रान अन्सारी, आकाश घोलप, सचिन खडतले, संदीप भोये अकबर खान, एजाज सय्यद आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भद्रकाली पाेलिसांनी या पदाधिकाऱ्यांना अटक करून सुटका केली.
माेदी सरकारविराेधात घाेषणाबाजी
केंद्र सरकारच्या विवीध धाेरणांचा निषेध करीत युवक काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी घाेषणाबाजी केली. यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नावाने घाेषणा देत लाेकशाही नव्हे तर ठाेकशाहीचा वापर केला जात असल्याच्या शब्दात निषेध नाेंदविला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.