आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक घटना:नाशिकमध्ये कॅनॉलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू; बी डी कामगारनगरमधील घटना

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर कॅनलमध्ये पाण्यात बडून तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवार दि.७ रोजी सायंकाळी ४ वाजता बिडी कामगार नगर निलगिरी बाग येथील एका लॉन्सच्या मागे उघडकीस आला. विलास लक्ष्मण पवार वय 36 असे या मृत तरुणाचे नाव आहे. आडगाव पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास पवार वय 36 हा फिरस्ता तरुण निलगिरी बाग येथील नातेवाईकांकडे आला होता. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास निलगिरी बाग येथील पुलावर लॉन्सच्या मागे काही मुले एका तरुणाच्या मागे पळत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. तरुण पुढे पळत असतांना कॅनलमध्ये पडला कॅनलमध्ये पाणी असल्याने तो पाण्यात बुडाला. काही तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले त्याला नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. आडगाव पोलिसांत अक्समात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरिष्ठ निरिक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

मुले मागे लागल्याची चर्चा

तरुणाचे काही मुलासोबत वाद झाल्याची चर्चा आहे. तो पळत असतांना त्याच्या मागे काही मुले पळत होते. जीव वाचवण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. पाण्यात बुडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिली.त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ निरिक्षक शेख यांनी दिली

बातम्या आणखी आहेत...