आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू : मुले पाठलाग करत असल्याचा संशय ; आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर कॅनॉलमध्ये पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजता बिडी कामगारनगर नीलगिरी बाग येथील एका लॉन्सच्या मागे उघडकीस आला. विलास लक्ष्मण पवार (३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास पवार (३६) हा तरुण नीलगिरी बाग येथील नातेवाइकांकडे आला होता. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास नीलगिरी बाग येथील पुलावर लॉन्समागे काही मुले एका तरुणाच्या मागे पळत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. तरुण पुढे पळत असताना कॅनॉलमध्ये पडला. कॅनॉलला पाणी असल्याने तो पाण्यात बुडाला. काही तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

मुले मागे लागल्याची चर्चा तरुणाचे काही मुलांसोबत वाद झाल्याची चर्चा आहे. तो पळत असतांना त्याच्या मागे काही मुले धावत होती. जीव वाचवण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. पाण्यात बुडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिली. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ निरिक्षक शेख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...