आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण मोहीम:कोरोना लसीकरणात तरुणांची आघाडी; तीन महिन्यांत प्रौढ आणि वृद्धांना टाकले मागे

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 1 मेेपासून तरुणांच्या लसीकरणास सुरुवात झाली

सर्वात अखेरीस कोविड-१९ च्या लसीकरणाची दारे खुली झालेल्या युवावर्गाने लसीकरणाच्या प्रगतीत मात्र प्रौढ आणि वृद्धांना मागे टाकत स्वत:तील "तरुण'पणा सिद्ध केला आहे. अतिजोखमीच्या वयोगटापासून लसीकरणास सुरुवात झाल्याने १८ ते ४५ या वयोगटास लसीकरणाची दारे तिसऱ्या टप्प्यात खुली झाली होती. राज्यात १ मेेपासून तरुणांच्या लसीकरणास सुरुवात झाली. मात्र, गेल्या तीन महिन्यांत तरुणांनी प्रौढ आणि वृद्ध या दोन्ही वयोगटांना मागे टाकत लसीकरणातील सर्वात वरचा टक्का गाठला आहे.

लसींची टंचाई आणि पुरवठ्यातील नियोजनाचा विचार करून कोरोना लसीकरण मोहिमेस तीन टप्प्यात सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जोखमीचा गट असलेले फ्रंटल वर्कर्स, ६० वर्षांवरील वृद्ध आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाली. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. अखेरीस, १ मेपासून १८ ते ४५ या युवावर्गाचे लसीकरण सुरू झाले. मात्र, या तीन महिन्यांत या वयोगटातील नागरिकांनी सुरुवातीपासून लसीकरणाची दारे खुली असलेल्या प्रौढ आणि वृद्ध वयोगटास मागे टाकले आहे.

जून महिन्यातील एकूण लसीकरणापैकी तब्बल ७२ टक्के लसीकरण १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी केले. शिक्षण व रोजगार यानिमित्ताने घराबाहेर पडण्याचे व प्रवासाचे प्रमाण असल्याने या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची निकड अधिक असल्यानेच त्यांनी लसीकरणात आघाडी घेतल्याचे स्पष्ट आहे. सोबतच ऑनलाइन नोंदणी व लसीकरण यातही हा वयोगट अग्रेसर असल्याने त्यांचा लसीकरणाचा टक्का वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...