आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर:'युवक राष्ट्रवादी'ची निदर्शने; शहीद चौकात जोरदार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गंगापूर रोड येथील शहीद चौकात आज सोमवारी (ता. 20) सकाळी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.

अग्निपथ योजना वापस लो, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश प्रवक्ते महेश तपासे व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे नमुद आहे की, भारतीय सैन्य दलात भरती होताना वयाची मर्यादा 17 ते 23 वर्ष व शिक्षणाची अट दहावी - बारावी केली गेली. तरुणांची चार वर्षाकरिता सैन्य भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यास "अग्निपथ योजना" नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीवर घेतले जाईल. त्यानंतर त्यापैकी 25 टक्के उमेदवार नोकरीत सेवेवर घेतले जाईल तर 75 टक्के युवकांची सेवा खंडित करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारे फक्त चार वर्षांच्या कंत्राटावर तरुणांना नोकरीवर घेणे, हे अयोग्य असून त्याचे दूरगामी परिणाम होणार आहे.

सैन्यात भरती झालेल्या तरुणांना दोन वर्षाकरीता प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी कमी करून सहा महिने करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती आहे. या निर्णयामुळे देशात बेरोजगारांची संख्या आणखी वाढणार असून हाताला काम नसल्याने प्रशिक्षण घेतलेले तरुण देश विरोधी कारवाई किंवा इतर चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत अग्निपथ योजना तत्काळ रद्द करुन सैन्यभरती पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, महेश भामरे, किशोर शिरसाठ, शादाब सय्यद, योगिता पाटील, मुकेश शेवाळे, बाळा निगळ, जय कोतवाल, गणेश पवार, सागर बेदरकर, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...