आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये जिल्हास्तरीय रोजगार मेळावा:28 ते 30 जून दरम्यान तरूणांना मिळणार रोजगार; जास्तीत जास्त रिक्तपदे नोंदवण्याचे आवाहन

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हयातील बेरोजगार तरूणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध हाेणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेकडून 28 ते 30 जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने,पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील मुलाखती ह्या मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतल्या जातील. मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवण्यासाठी व नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवार यांना एकछत्रा खाली सुविधा उपलब्ध होण्याकरीता महास्वयंम वेबपोर्टलवरून हे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हयातील औद्योगिक आस्थापनांमध्ये आवश्यक मनुष्यबळाचा सहभाग आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे या नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या ऑनलाईन अॅप्लाय केलेल्या उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील web portal वर लॉग-इन करावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रते नुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त रिक्तपदे नोंदवा

भरती इच्छुक नियोक्त्यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शन वर Clik करून “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” NASHIK ONLINE JOB FAIR-3 (2022-23) यावर त्यांच्याकडील रिक्तपदेजनरल, ईपीपी, ॲप्रटिंस इत्यादी अधिसूचित करावी.या मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिध्दी विभागाच्या वरील वेबपोर्टलवर विनामुल्य करावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाचा दूरध्वनी 0253-2993321 या वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा असे आवाहन काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता विभागाच्या नाशिकच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.ला.तडवी यांनी केले आहे.