आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात लावला सापळा:जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा शाखा अभियंत्याला ठेकेदाराकडून दिड लाखांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. अमोल खंडेराव घुगे असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती अशी, तक्रारदार हे शासकीय स्थापत्य ठेकेदार आहे. त्यांनी मौजे पाथरे ता. सिन्नर येथे नळ पाणी पुरवण्याचे काम नियमानुसार पुर्ण केले आहे. या कामाचे 48 लाखांचे देयक बिल तयार करुन ते मंजुर करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सादर केले होते. संबधित शाखा अभियंता घुगे याने बिल मंजुर करण्यासाठी 4 टक्के दराने 1 लाख 90 हजारांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 1 लाख 50 हजार रुपये मागीतले. तक्रारदार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पथकाने सापळा रचला. अभियंता घुगे यास दिड लाखांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली. उपअधिक्षक अभिषेक पाटील, सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील, यांच्या पथकाने अधिक्षक सुनिल कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहळदे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...