आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन काेठडी:लाच प्रकरणी अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या अभियंत्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अमाेल घुगे या अभियंत्यास दिड लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली हाेती. त्यांच्या काेठडीची मुदत संपल्याने साेमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन काेठडी सुनावली. त्यामुळे त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नळ पाणी पुरवठ्याचे काम नियमानुसार पुर्ण केल्यानंतर 48 लाख रुपयांचे बिल तयार करुन ते मंजुर करण्याच्या माेबदल्यात घुगे यांनी 4 टक्के रक्कम 1 लाख 90 हजार रुपयांची मागणी केली हाेती. तडजाेडी अंती 3 टक्क्यांप्रमाणे दिड लाख रुपयांची रक्कम त्यांनी कार्यालयात स्विकाऱताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली हाेती. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यानंतर जिल्हा परिषदेत पुन्हा घडलेल्या लाचखाेरीच्या प्रकारामुळे जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत आली आहे.

बांधकाम विभागातील गर्दी झाली कमी

ग्रामीण पाणी पुरवठा विभागात घडलेल्या लाचखाेरीच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेच्या इतर विभागांनी माेठा धसका घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातही टक्केवारीसाठी ठेकेदारांच्या फायली प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप ठेकेदारांकडून केला जात आहे. मात्र घुगे यांच्या अटकेनंतर बांधकाम विभागासह अन्य विभागात ठेकेदारांचा वावर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...