आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आविष्कार स्पर्धा:'बायो फर्टिलायझर' प्रकल्पास दुसरा क्रमांक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे आयोजन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांची धुळे येथे झोनल लेव्हल आविष्कार स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत नाशिकच्या मेट इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसीमधील साहिल काकुस्ते आणि आदिती खैरणार या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बायो फर्टिलायझर फॉर्म्युलेशन फॉर पोटॅशियम बूस्टिंग या प्रकल्पास दुसरा क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रशस्तिपत्र देऊन गाैरविण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत आविष्कार स्पर्धा राबविण्यात येते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मेट डी. फार्मसी कॅम्पसमध्ये पार पडला. झोनल लेव्हल राऊंड हा धुळे येथील बापूसाहेब देवरे कॉलेज येथे शनिवारी पार पडला. या स्पर्धेत संपूर्ण नाशिक जिल्हयातील बाटू विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचा समावेश होता. पदवीधर या गटात मेट फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. एन शेख तसेच अविष्कार स्पर्धेचे समन्वयक सहयोगी प्रा. अमित काकड आणि सहयोगी प्रा. शिवम लाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

पिकांच्या वाढीचा अभ्यास करणारा प्रकल्प

विद्यार्थ्यांनी संशोधन करत बायो फर्टिलायझरचा प्रकल्प तयार केला. हा प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेती पिकांच्या वाढीसाठी बायो फर्टिलायझरची निर्मिती आणि त्याचा वापर कसा होतो, हे या प्रकल्पातून समजते.

पुणे विद्यापीठात राज्यस्तरीय स्पर्धा

राज्यभरातील 22 विद्यापीठातील निवड झालेल्या प्रकल्पांची अंतर्विद्यापीठीय स्पर्धा यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. 13 जानेवारीपासून अविष्कार स्पर्धेला सुरुवात होईल. आंतर विद्यापीठ स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांसह फेलोशिपही दिली जाणार आहेत. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड होणारे प्रकल्प पुढे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या अन्वेषण या स्पर्धेत सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...