आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेचे ८४ गट व पंचायत समितीच्या १६८ गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना आज (दि.२) प्रशासनाने प्रसिद्ध केली. या रचनेवर ८ जून २०२२ पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना वेळेत दाखल कराव्यात, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी केली आहे.
जिल्ह्यातील २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद गटांची व पंचायत समितीच्या गणांची प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठीची अधिसूचना आज २ जून २०२२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.