आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांडग्याने तोंडाला चावा घेतला:पिसाळलेल्या लांडग्याने 13 जणांना केले जखमी, जखमी झालेल्या नागरिकांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

सिन्नरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पिसाळलेल्या लांडग्याने सिन्नर - कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर पुतळेवाडी, विघनवाडी, शहाजापूर, कोळपेवाडी परिसरात धुमाकूळ घालत तब्बल १३ हून अधिक नागरिकांवर हल्ले करत जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.११) घडली. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी परिसरात शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गोकुळ नरोडे‌ यांच्या वस्तीवर सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अंगणात झोपलेल्या विठाबाई अर्जुन नरोडे (६०) या महिलेवर हल्ला करत लांडग्याने त्यांच्या तोंडाला चावा घेतला. त्यांच्या ओरडण्याने घरातील सदस्य जागे झाल्यानंतर या लांडग्याला हुसकावून लावले. दरम्यान, पूर्व भागातील भरतपूर (विघनवाडी) या परिसरात सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास मस्के वस्ती परिसरात पोहोचलेल्या‌ या लांडग्याने हल्ला चढवत येथील ४ महिलांना गंभीर जखमी केले. तर इतरांनाही लांडग्याने जखमी केले. या लांडग्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.