आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिन्नर शहरात ३९ गुंठ्यांवर देवराई ऑक्सिजन पार्क साकारण्यात येणार आहे. हा शहरातला दुसरा प्रकल्प आहे. दुर्मिळ औषधी वनस्पतींची विविध प्रकारची ९०० झाडे लावण्यात येणार असून ध्यानधारणा, योगा आदी सुविधांसह देवराईची माहिती सचित्र उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाची उभारणी संपूर्णपणे श्रमदानातून केली जाणार आहे. ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत देवराई विकसित केली जाणार आहे. सरदवाडी मार्गावरील देशमुखनगरात ही देवराई होणार आहे. मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते देवराई श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, प्रकल्प अधिकारी अनिल जाधव, बांधकाम अभियंता सौरभ गायकवाड, नगररचना सहायक अजय कोलते, ताहीर शेख, समाधान सापुते आदींसह वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.