आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्प कर्मचारी, समृद्धी, सिन्नर- शिर्डी, सुरत- चेन्नई महामार्ग, नाशिक -पुणे रेल्वेमार्ग अशी सार्वजनिक प्रकल्पांची वाढती संख्या, त्यांच्या भूसंपादनासाठी मोजणीचे वाढलेले काम आणि मोजणीचे नादुरुस्त झालेले ‘इटीएस’ मशीन यामुळे वारंवार चकरा मारूनही सिन्नरच्या भूमीअभिलेख कार्यालयातून जमीन मोजणीसाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे.
अति अति तातडीच्या मोजणीसाठी १५ दिवसांऐवजी दोन ते तीन महिने, अति तातडीच्या मोजणीसाठी दोन महिन्यांऐवजी चार ते पाच महिने, तातडीच्या मोजणीसाठी तीन महिन्यांऐवजी सहा ते आठ महिने तर नियमित मोजणीसाठी सहा महिन्यांऐवजी तब्बल वर्ष-दीड वर्ष नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. याउपर मोजणी झाल्यानंतरही हद्द कायम करण्यासाठीही अधिकाऱ्यांची मनधरणी करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
हद्द कायम, नियमित, तातडी, अति तातडी, अति अति तातडी, पोटहिस्सा मोजणी, बिगरशेती इत्यादी प्रकारची वर्षभरापासून ८७६ मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. बऱ्याचदा ऑनलाइन तारीख देऊनही मोजणी अधिकारी नियोजित स्थळी पोहोचत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. भूमीअभिलेख कार्यालयास मोजणीसाठी देण्यात आलेली दोन्ही ‘इटीएस’ अर्थात इलेक्ट्रॉनिक स्टेशन मशीन दोन वर्षांपासून नादुरुस्त आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांना टेबलवर मोजणी करावी लागत असून ही प्रक्रिया वेळखाऊ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.