आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर घणाघात:खोकेवाले म्हटले तर राग येतो, चिडून पाहतात... ऐकतात फक्त दिल्लीश्वरांचे!

सिन्नर/घोटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्यांत हिंमत असेल तर माझ्यासमोर वरळीत निवडणूक लढवून दाखवावी. नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवायला तयार आहे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. नाशिक जिल्हा दौऱ्यात त्यांनी हे आव्हान दिले.

आदित्य म्हणाले, आमच्यासोबत गद्दारी झाली आहे. पाठीवर वार घेऊन महाराष्ट्रात फिरतोय. अशाही स्थितीत लढायला तयार आहोत. हे सरकार कोणाचेच ऐकत नाही. ऐकते फक्त दिल्लीश्वरांचे. त्यांना एकच भाषा समजते ती म्हणजे खोक्यांची.. ५० खोके बोलले की राग येतो, आमच्याकडे चिडून पाहतात, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली. माळेगाव येथे संवाद यात्रेप्रसंगी ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. ठाकरे यांनी व्यासपीठावरून खाली उतरून उपस्थितांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, मी स्वाभिमानाने राज्यात फिरू शकतो, उभा राहू शकतो. तसे खोकेवाले फिरू शकत नाहीत. त्यामुळे डरपोक सुरत आणि तेथून गुवाहाटीला गेले. हे सरकार जनतेचे नाही.

दादा भुसे यांचे प्रत्युतर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. मात्र केवळ राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून आजोबा चोरले म्हणणे हा मनाचा कोतेपणा आहे. ते उद्या आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती चोरले असेही म्हणतील, असा टोला पालकमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

जिंदाल प्रकरण दडपले जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीतील आगीत अनेक कामगारांचा मृत्यू झाला. सरकारने हे प्रकरण दाबले आहे. यावर विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून बळी गेलेल्यांना न्याय देण्यााच प्रयत्न करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (दि.६) सांगितले. इगतपुरीतील मुंढेगाव येेथे स्थानिक युवकांनी जिंदाल आगीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते बाेलत हाेते.

एवढी गद्दारी कोणासाठी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. कोरोनात साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आता उद्योग पळून जात असल्याची त्यांनी नावानिशी यादी वाचली. महाराष्ट्राचा आवाज बुलंद राहिलेला नसून एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे हे झाल्याची टीका करत हा लढा तुमच्यासाठी आहे, अशी भावनिक साद ठाकरेंनी दिली.

बातम्या आणखी आहेत...