आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम टंचाई:दुसऱ्यांदा फुटली कडवाची जलवाहिनी, आज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता; आगासखिंडजवळ ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यव

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या कडवा योजनेची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी (दि. १) ७ वाजेच्या सुमारास आगासखिंड शिवारात फुटली. ऐन उन्हाळ्यात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यव झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्रीतून लिकेज काढण्याचे काम पूर्ण करून शनिवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसरे यांनी दिली.

११ फेब्रुवारीला बोरखिंड शिवारात कडवाची जलवाहिनी फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकात व गावामध्ये पाणी शिरले होते. यामुळे काही पिकांचे नुकसानही झाले होते. जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाच-सहा दिवसांचा कालावधी लागल्यामुळे शहरवासीयांना टंचाईचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा बोरखिंड शिवारातच जलवाहिनी फुटल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.

सिन्नरकरांकडून नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पाइपलाइन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकल्याने नागरिकांमधून नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे रहात असून संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जलवाहिनी लिकेज होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाल्याने ही समस्या उद्भवत असल्याचा आरोप शहरवासीयांकडून होत आहे.

शहरास होणारा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने
कडवा योजनेची ६०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी आगासखिंड गावातील साईबाबा मंदिरा जवळ लीक झाल्याने शहरास होणारा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार आहे. २ एप्रिल रोजी दुपार नंतर पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे लिकेज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...