आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद यात्रा:मनसेच्या इंजिनला भाजपचे इंधन; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची टीका

घोटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे ओबीसी प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असून, त्यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. तसेच मनसे ही मोदी नकलाकार सेना असून ती भाजपची सी टीम आहे. भाजप हा खरा जातीयवादी पक्ष असून मनुस्मृती मानणारा असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली.

शरद युवा संवाद यात्रेनिमित्त घोटी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवराम झोले होते. यावेळी गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे या नेत्यांनी पक्षवाढीसाठी जीवाचे रान केले. मात्र, सत्ताकाळात त्यांना बाजूला सारून मुख्यमंत्री वेगळ्याच व्यक्तीला केले गेले. मशिदींवरील भोंगेप्रश्नी मनसेच्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांच्या इंजिनमध्ये भाजपच इंधन टाकते, अशीही टीका मेहबूब शेख यांनी केली.

यावेळी वासाळीचे सरपंच काशीनाथ कोरडे व कुरुंगवाडीचे सरपंच गोपाळ सावंत, कावनईचे गोपाळ पाटील, कुर्णोलीचे सरपंच विलास जोशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. संबंधित पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, प्रदेश सचिव शाहबाज शेख, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जि. प. सदस्य उदय जाधव, माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण, पांडुरंग वारुंगसे, केरू दादा खतेले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनिल पढेर, सुनील वाजे, उमेश खातळे, युवक तालुकाध्यक्ष हरीश चव्हाण, मदन कडू, सरपंच काशीनाथ कोरडे, डॉ. सुधाकर जगताप, भाऊ पासलकर, शहराध्यक्ष नीलेश जगताप, पांडुरंग खातळे, किरण मुसळे, मनिष भागडे, वसिम सय्यद, नामदेव शिंदे, आकाश खारके आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...