आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९९२ ची दहावीची परीक्षा दिल्यानंतर डुबेरे जनता विद्यालयातील ७२ माजी विद्यार्थी तब्बल ३० वर्षांनी भेटले. मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनाच पुन्हा भुतकाळात नेले. जुन्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले. मेळाव्यास तत्कालीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
मेळाव्यात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर विविध कारणांनी मृत्यू झालेल्या वर्ग मित्र, गुरुजनांना आदरांजली वाहण्यात आली. तत्कालीन शिक्षक शरद रत्नाकर, एस. डी. पवार, जे. के. कुऱ्हे, एस. पी. मोरे, सी. एम. दातीर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमधून सरपंचपदावर असलेल्या अर्जुन वाजे, पाटोळेचे उपसरपंच रामहरी खताळे, शिंदेच्या सरपंच सत्यभामा वारुंगसे-तुंगार यांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मेजर सोमनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कृष्ण कराड यांचे कौतुक केले.
शालेय संस्काराची शिदोरी महत्त्वाची
शालेय दशेतच जीवनाला आकार मिळतो. ही शालेय संस्काराची शिदोरी आयुष्यभर सांभाळून जगावे लागते. आई-वडील, शिक्षक व मित्रांचाही जीवनातील वाटचालीत सहभाग असतो. माजी विद्यार्थी मेळाव्यातून विचारांची होणारी देवाण-घेवाण पुढील वाटचालीस दिशा देणारी ठरते असे मत शरद रत्नाकर यांनी व्यक्त केले.
डॉ. दिलीप पावसे यांनी प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश सांगितला. हॉटेल पंचवटी मोटेल्स मध्ये झालेल्या या मेळाव्याप्रसंगी पुन्हा एकत्र येत राहण्याचे ठरवून जड पावलांनी एकमेकांचे निरोप घेतला. मोहन माळी यांनी सूत्रसंचालन केले. तर संजय ननावरे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.