आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:ग्रामीण भागातील मुलांसाठी दोडीत  पाच मे पासून बालसंस्कार शिबिर; 15 दिवस मोफत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था

सिन्नर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोडी बुद्रुक येथे दि. ५ ते २०‌ मे दरम्यान, बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मृदंगाचार्य सुमंत महाराज उगले, किर्तन केसरी कृष्णाईदास अतुल महाराज माळी, युवा कीर्तनकार माउली महाराज हेंबाडे, मृदंगाचार्य शंकर महाराज वानखेडे, दिनेश महाराज माळी आदींनी केले आहे.

भौतिक साधनसामग्रीने संपन्न होत असलेले मानवी जीवन, स्वैराचार, तद्वतच मनोविकारता व नैराश्याने ग्रासित झालेले असून २१व्या शतकातील नवीन पिढी कितीही बुद्धिमान व गुणशाली असली तरी त्यांना योग्य संस्कारांची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच उद्देशाने दोडी येथील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवार (दि. ५) पासून निवासी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजव्यवस्थेतील बालकवर्ग, युवकवर्ग घडावा यासाठी पहाटे ५ ते ६ योगासन, ७ ते ८ प्रार्थना, ८ ते ९ हनुमान चालिसा, १२ ते १ विचारवंतांची प्रवचने व व्याख्याने, १ ते २ विश्रांती सायंकाळी ४.३० ते ६ हरिपाठ, ६ ते ६.३० पखवाज वादन शिकवणे, ७ ते ८ वारकरी चालीचा सराव, ८ ते ९ जेवण, ९ ते ९.३० चिरंजीव पद गीता संहिता, दुपारी २ ते ३ शारीरिक शिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. जेवणाची व राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली असून जास्तीत जास्त बालक व युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी मृदंगाचार्य सुमंत महाराज उगले (७६२०६२१५३६), कीर्तनकेसरी कृष्णाईदास अतुल महाराज माळी, युवा कीर्तनकार माउली महाराज हेंबाडे, मृदंगाचार्य शंकर महाराज वानखेडे, दिनेश महाराज माळी (८६९८००४५२६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...