आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगाव पोलिसांची मोठी कामगिरी:बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीचा केला भांडाफोड, 500 रुपयांच्या जवळपास दीड लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त

लासलगाव (प्रदीप गायकवाड)6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पाच संशयितांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये येथील महिला डॉक्टरचा समावेश असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत लासलगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहन बाबुराव पाटील, डॉ प्रतिभा बाबुराव घायाळ, विठ्ठल चंपालाल नाबरिया सर्व राहणार लासलगाव यांना रवींद्र हिरामण राऊत राहणार पेठ जिल्हा नाशिक व विनोद मोहन भाई पटेल राहणार पंचवटी नाशिक हे दोन्ही सम बनावट ५०० रुपयांच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती मिळाली होती.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, स.पो.उ.नि. राजेंद्र अहिरे, पोलीस हवालदार बाळु सांगळे, पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, संदिप शिंदे, प्रदिप आजगे, गणेश बागुल, कैलास मानकर, सागर आरोटे, देविदास पानसरे, मनिषा शिंदे, माया वाघ यांचे पथकाने येवला रोड विंचुर येथे सापळा रचला. लासलगाव येथील मोहन पाटील, डॉ.प्रतिभा घायाळ, विठ्ठल नाबरीया यांना बनावट ५०० दराच्या २९१ नोटा देण्यासाठी आलेले रविंद्र हिरामण राऊत, विनोद मोहनभाई पटेल हे त्यांच्याकडील इटीऑस कार क्रमांक एमएच ०३ सीएच ३७६२ मध्ये आले असता पंचासमक्ष छापा टाकुन त्यांच्याकडून बनावट नोटा व कार किमंत अंदाजे ४,००,००० रु जप्त करण्यात आली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे यांचे फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस स्टेशनला पाचही आरोपींविरुद्ध विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४८ ९ क, ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करत आहेत. या बनावट नोटांच्या टोळीमध्ये लासलगाव मधील महिला डॉक्टरचा समावेश आढळल्याने लासलगावात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...