आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना निर्बंध हटविल्याने दोन वर्षांनंतर नागरिकांनी खरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी आदल्याच दिवशी दुकानांत गर्दी केली.
दुचाकी, चारचाकी वाहने, तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे वाहनांचे शोरूम, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, मोबाइल शॉपी आदी दुकानांची सजावट करण्यात आली होती. सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विविध सवलती देण्यात आल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफी दुकानेही सजली आहेत. मागील दोन वर्षे गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट होते. आता आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आल्याने सोने खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.
गुढी उभारण्यासाठी लागणारे हार खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. नवीन पूल, गंगा वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश पेठ, नाशिक वेस, सरदवाडी मार्गावर थाटलेल्या दुकानांत गर्दी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत हार दहा ते वीस रुपयांनी महागले आहेत. गतवर्षी ४० ते ५० रुपये असलेले हार यंदा ६० ते ८० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत होते. आकारानुसार कड्यांची २० किंमत ४० रुपये इतकी होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.