आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समता परिषदेची आढावा बैठक:ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता सैनिकांनी सज्ज व्हावे; जिल्हाध्यक्ष दराडे यांचे आवाहन

निफाड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे समता सैनिकांनी पुन्हा एकदा कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे, असे आवाहन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांनी केले. निफाड, पिंपळगाव बसवंत व ओझर या भागातील समता सैनिकांची बैठक पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते. संघटनेची बांधणी मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा उपक्रम तालुकास्तरावर राबविणार आहे. तसेच पालकमंत्री छगन भुजबळांनी आजपर्यंत बहुजन समाजाच्या सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला व यापुढेही ते करत राहतील,असे दराडे यांनी सांगितले.

यावेळी इगतपुरीचे तालुकाध्यक्ष शिवा काळे, निफाड तालुकाध्यक्ष विलास बोरस्ते, संपतराव विधाते, सुरेश खोडे, अजय गायकवाड, विलास कुटे, राजेंद्र खोडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

नाशिक जिल्हा समता परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने फेरबदल करण्यात आले असून त्यानुसार नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दराडे हे जिल्हा दौऱ्यावर आहेत. समता परिषदेची संघटनात्मक बांधणी, नवीन कार्यकारिणीची निवड व सद्यस्थितीत बहुजन समाजासमोर असणाऱ्या आव्हानांची जनजागृती करण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. याप्रसंगी माधवराव ढोमसे, केशव खोडे, भगवान विधाते, दशरथ विधाते, मोतीराम पवार, कमलाकर मंडलिक, अशोक खोडे, मुकुंद खोडे, अरुण खोडे, पोपटराव विधाते, अरुण खोडे, अनंत खोडे, बाळकृष्ण खोडे, जगन्नाथ खोडे यांच्यासह समता सैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...