आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत रविवारी लागलेली आग त्वरित पसरण्यामागे कंपनीत अस्ताव्यस्त पडलेला व अतिरिक्त साठवून ठेवलेला कच्चा माल, स्क्रॅप यांसारख्या दुर्लक्षित न करता येणाऱ्या गंभीर बाबी समाेर आल्या आहेत. कंपनीचे सेफ्टी ऑडिट गत महिन्यातच झाल्याचे समाेर आले असले तरी सुरक्षा नियमांनुसार कंपनीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा कॅबिनपासून महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक असलेला ऑनसाइट इमर्जन्सी प्लॅन तसेच कंपनीचा नकाशाही लावलेला नसल्याचे तसेच अग्निशमन दलाला हा नकाशा उपलब्ध दुर्घटनेप्रसंगी कंपनीत नेमके किती कामगार उपस्थित हाेते, याबाबतची माहिती कंपनीकडे नाही. ही माहिती दिली जात नसल्याने स्थानिकांनी कंपनीवर राेष व्यक्त केला आहे.
रविवारी दिवसरात्र ही कंपनी अक्षरश: धुमसत हाेती. साेमवारी दुपारी आगीवर नियंत्रण मिळाले, मात्र धुराचे लाेट अद्यापही पहायला मिळत आहेत. या गंभीर घटनेनंतर अशा घटना घडू नयेत याबाबतच्या कंपनीच्या त्रुटी समाेर येत आहेत. कंपनीमध्ये कच्चा माल, स्क्रॅप अतिरिक्त प्रमाणावर स्टाेअरेजची जागा साेडून खचाखच भरलेला पहायला मिळाला, मुळात हा माल आगीसाठी पूरक हाेता. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे हाेते.
कंपनीमध्ये अशा घटनांसाठी हायड्रंट कुठे आहे? ते कार्यान्वित कसे हाेईल? घटना घडली तर कामगारांनी पळून कुठे जाऊन एकत्रित व्हायचे? याचा काेणताही अॅक्शन प्लॅन येथे दिसून आला नसल्याची चर्चा सुरू आहे. कंपनीकडून सुविधा : कंपनीच्या आतील काॅलनीमध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांच्या निवासाची सुविधा व कॅन्टीन सुविधा कंपनीने दिल्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले.
आग नियंत्रणासाठी मदत : जिंदाल कंपनीतील आग विझवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी प्रसारमाध्यमांना पाहणीनंतर दिली.
कंपनीने कामगारांची संख्या अद्याप दिलेली नाही कंपनीत १४५० कंत्राटी कामगार तर १२५० कायम कामगार काम करतात. एका शिफ्टमध्ये येथे किमान ७०० कामगार काम करतात. मात्र रविवार असल्याने ही संख्या कमी हाेती. नेमके किती कामगार घटना घडली त्यावेळी कार्यरत हाेते, याची माहिती अद्याप कंपनी संकलित करत आहे. त्यांनी अद्याप ही माहिती दिलेली नाही. - विकास माळी, कामगार उपायुक्त
कंपनीने सेफ्टी ऑडिटचा रिपाेर्ट दाखल केला नाही जिंदाल कंपनीच्या बॅचपाॅली विभागात धूर दिसून आला व नंतर आग व स्फाेट झाल्याचे कामगारांनी सांगितले. आग विझली असली तरी अद्यापही घटनास्थळावर पाेहाेचणे शक्य हाेत नाही, सामान्य स्थिती झाल्यानंतर येथे घटनेमागील नेमके कारण शाेधणे शक्य हाेणार आहे. कंपनीचे सेफ्टी ऑडिट मागील महिन्यात पूर्ण झाले हाेते, नियमाप्रमाणे दीड महिन्यात त्यांना ते सादर करता येते, मात्र अद्याप आमच्या कार्यालयाकडे कंपनीने हा रिपाेर्ट दाखल केलेला नाही. - अंजली आढे, सहसंचालक, आैद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालय
लक्ष्यापर्यंत पाणी पाेहाेचत नसल्याने अडचणी कंपनीकडे अग्निशमन बंब हाेता पण ताे घटनेत दबला गेला हाेता. कंपनीचा नकाशा जरी उपलब्ध झाला नाही तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठे काय आहे? याची सविस्तर माहिती दिल्याने आग विझवण्यास मदत मिळाली. आग विझवण्यासाठी लक्ष्यापर्यंत पाणी पाेहाेचू शकत नव्हते. आगीवर आता नियंत्रण मिळालेले असले तरी यानंतर काेणी अजून मृत झालेले नाही ना? याचा आम्ही शाेध घेऊ. - संजय बैरागी, प्रभारी अग्निशमन अधिकारी, महापालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.