आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सिन्नरमध्‍ये झालेल्‍या 3 वाहनांच्‍या भीषण अपघातात पाच विद्यार्थी ठार

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - नाशिक‌ महामार्गावर मोहदरी घाटात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास तीन वाहनांच्या भीषण अपघातात नाशिक येथील ५ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यात ३ मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. यातील काही विद्यार्थी हे नाशिकच्या केटीएचएम, भोसला मिलिटरी स्कूल आणि मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजमधील असल्याचे समोर आले आहे.

मृतांत भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ११ वीत शिकणारा हर्ष दीपक बोडके (१७), केटीएचएम महाविद्यालयात ११ वीत शिकणारी सायली अशोक पाटील (१७) प्रतीक्षा दगू घुले (१७) शुभम तायडे (१७), इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकणारी मयूरी अनिल पाटील (१७) यांचा समावेश आहे.‌

बातम्या आणखी आहेत...