आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनसेवा प्रतिष्ठान व घाटनदेवी मंदिर ट्रस्ट, इगतपुरीतर्फे आर्थिक दुर्बल घटकातील वधुवरांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. घाटनदेवी मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.
यात वर आणि वधूचे लग्नायोग्य वय, आर्थिक दुर्बल घटक आणि कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या परिवारास प्राधान्य देण्यात आले. या सोहळयात वधू-वरांना कन्यादानाचे भांडे, विवाहासाठी कपडे, वधू-वर यांच्या दोन्ही बाजूकडील ५०-५० नातेवाइकांना भोजन आयोजकांतर्फे देण्यात आले.
विवाहानंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळींशी कसे समरस व्हावे, तसेच आरोग्यविषयक जागरूकता, स्त्रीभ्रूण हत्याविरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशनसुद्धा करण्यात आले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, रेल्वे पोलिस निरीक्षक राकेशकुमार, सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नयना गावित यांनी भाषणे केली. महंत फलाहारी महाराज यांनी सामुदायिक सोहळे आगामी काळात व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील, सुनील बच्छाव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, विठ्ठल लंगडे, प्रशांत कडू, अनिल भोपे, नंदलाल भागडे, बाळासाहेब सुराणा, घोटी टॅपचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, अनिता घारे, हरिष चव्हाण, कृउबा संचालक तुकाराम वारघडे, रानकवी तुकाराम धांडे, मनसे नेते भोलेनाथ चव्हाण, दौलत बोंडे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.