आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:गामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा; शरद संवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांचे आवाहन

नांदगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कार्यकर्ता जोडला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही. मात्र आपण निवडणूक लागली तरच त्याची तयारी पंधरा दिवसांत करतो. असे न करता आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद संवाद यात्रेत केले.

शेख म्हणाले की, चिल्लरचा आवाज केला तर तो मोठा असतो मात्र नोटांचा आवाज होत नाही, परंतु किंमत मोठी असते. आपला माणूस सुशिक्षित आहे, त्याची किंमत मोठी आहे, त्यामुळे कुणालाही न घाबरता अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे धाडस पदाधिकाऱ्यांनी करावे असे शेख यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, डॉ. वाय. पी. जाधव उपस्थित होते. यावेळी युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, हबीब शेख, नगरसेवक वाल्मीक टिळेकर, नारायण पवार, राजू लाठे, दत्तू पवार, सचिन जेजूरकर, अशोक पाटील, डॉ. भरत जाधव, किसनराव जगधने, प्रताप गरुड, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, नीलेश पवार, संपत पवार, संतोष बिन्नर, शिवा माळी, अक्षय पवार, गणेश चव्हाण, शुभम शिंदे, विशाल काळे, यश चव्हाण, विकास उशिरे, राहुल आहिरे, पंढरीनाथ गायकवाड, आकाश शेलार, किशोर महाजन, नरेंद्र महाजन, बापू रौंदळ, अक्षय देशमुख, दिलीप निकम, महेश पवार, योगिता पाटील, सुगंधा खैरनार, जयश्री जुन्नरे, कविता राऊत आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...