आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोट्यवधी रुपयांची पाणीयोजना राबवूनही शहराला दररोज पाणी मिळत नसल्याने पाणीपट्टी, वाढीव घरपट्टी कमी करावी, शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करुन दिलासा द्यावा, यांसह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून घागरी फोडण्यात आल्या.
प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कृत्रिम पाणीटंचाई दूर होऊन सिन्नरकरांना रोज नियमित पाणी मिळावे, वाढीव घरपट्टी कमी झाली पाहिजे, मातंगवाडीत, जोशीवाडीत रस्ते, गटारी, घरकुल झाले पाहिजे आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी मंत्री बच्चू कडू यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. सकाळी एक तास कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करुन त्यानंतर माठ व घागरी फोडून आपला पाणीटंचाईबाबतच संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी माठ फोडून आजी-माजी सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी प्रहारचे उपाध्यक्ष गोपाळ गायकर, शिवाजी गुंजाळ, शहराध्यक्ष अमित शिंदे, संदीप लोंढे, रमेश लाड, दशरथ कुरणे, पिंटू आंबेकर, उत्तम लोंढे, राहुल रु पवते, सुनील महे, चिंधू गुंजाळ, संजय कदम, नंदू महाराज, नीलेश चव्हाण यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.