आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिफाड तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या शिवडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नम्रता पॅनलने अकरा जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे. मधुकर खापरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला अवघ्या दोन जागा मिळविता आल्या आहेत.
सोसायटी निवडणुकीसाठी सत्ताधारी बाळासाहेब क्षीरसागर यांच्या नम्रता पॅनलला विरोधी मधुकर खापरे गटाच्या परिवर्तन पॅनलने आव्हान उभे केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी कैलास सोनवणे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यात एकूण ३८० सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात आला.
यात कर्जदार सर्वसाधारण गटातून नम्रता पॅनलचे बाळासाहेब क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, गजीराम क्षीरसागर, बाबाजी सानप, भिकाजी क्षीरसागर, रघुनाथ शिंदे तर परिवर्तनचे मधुकर खापरे, भाऊसाहेब बोरसे हे विजयी झाले. महिला राखीव गटातून नम्रता पॅनलच्या वंदना क्षीरसागर, भारती क्षीरसागर या विजयी झाल्या. इतर मागासवर्ग राखीव गटातून नम्रताचे अॅड. रामनाथ शिंदे, अनुसूचित जातीजमाती गटातून नम्रताचे बाळासाहेब शिरसाठ, भटक्या जाती-जमाती राखीव गटातून नम्रताचे विजय सानप विजयी झाले.
निवडणुकीचा निकाल घोषित होताच द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक अजित सानप, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, भाऊसाहेब क्षीरसागर, बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, साहेबराव सानप, शांताराम क्षीरसागर, जयराम क्षीरसागर, भगीरथ शिंदे, मुरलीधर क्षीरसागर, नितीन क्षीरसागर, माजी सरपंच प्रमोद क्षीरसागर, माजी चेअरमन कैलास क्षीरसागर, रामनाथ सांगळे, नानासाहेब शिंदे, परशराम क्षीरसागर, सचिन क्षीरसागर, दिलीप शिंदे, विश्वास क्षीरसागर, वैभव क्षीरसागर, ज्ञानेश्वर सानप, संजय क्षीरसागर, नारायण शिंदे, महेश शिंदे, बाबाजी क्षीरसागर, अरुण क्षीरसागर, संजय क्षीरसागर, भाऊसाहेब दरेकर, किशोर रितेश क्षीरसागर, बाळासाहेब क्षीरसागर, तेजस शिंदे, काका क्षीरसागर, अमोल शिंदे, राकेश क्षीरसागर आदींनी जल्लोष साजरा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.