आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती मृत्‍यू:इनोव्हा कारची दुचाकीला धडक; नाशिकच्या मायलेकाचा मृत्यू

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावीजवळ साई शर्वरी लॉन्ससमोर इनोव्हा कारने (एमएच ०८ एएम ३३८३) दुचाकीला (एमएच १५ एचव्ही ७०८१) धडक दिल्याने मायलेकाचा रविवारी मृत्यू झाल्याची घटना (दि. ११) सकाळी ११ च्या सुमारास घडली. वैभव अशोक कुलकर्णी (३८) व सुवर्णा अशोक कुलकर्णी (७०, रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. सध्या नाशिकला राहत असलेल्या कुलकर्णी कुटुंबीयांची वावी जवळील फुलेनगर येथे शेती असून रविवारी सकाळी ते नाशिक वरून फुलेनगरला येण्यासाठी रविवारी निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...