आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात हजेरी:राजकीय भवितव्यासाठी मुख्यमंत्रीही ‘सरकार’सोबत इशान्येश्वर चरणी!

भारत घोटेकर | सिन्नर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. २३) मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात हजेरी लावत दर्शन घेत पूजा केली. विशेष म्हणजे हा दौरा गोपनीय होता. यासंदर्भात शासकीय यंत्रणांना पुसटशी कल्पनाही नव्हती.

बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या पत्नी, महसूलमंत्री विखे, शिक्षणमंत्री केसरकर यांचे मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात आगमन झाले. तेथे ब्रह्मांड शास्त्रज्ञ तथा श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅ. अशोककुमार खरात यांच्या मंत्रोच्चारात या तिन्ही मंत्र्यांनी ईशान्येश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक केला. पूजानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. संस्थानतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी शिर्डीकडे कूच केले. याप्रसंगी शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामकर्ण आवारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...