आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडांगळी विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रामनाथ खुळे यांची तर उपाध्यक्षपदी संपत खुळे यांची अविरोध निवड करण्यात आली.
महिनाभरापूर्वीच या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध झाली होती. ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे, शिवाजी आप्पा खुळे त्याचबरोबर माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाचे नेते शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे यांनी आपसात चर्चा करून ही निवडणूक अविरोध केली.
यावेळी सुदेश खुळे गटाचे १० तर दीपक खुळे गटाचे ३ संचालक निवडण्यात आले. सर्वसाधारण गटातून रामनाथ खुळे, संपत खुळे, तुळशीराम खुळे, दीपक खुळे, शंकर खुळे, योगेश खुळे, सचिन खुळे, लक्ष्मण खुळे, महिला राखीव गटातून शिला विजय खुळे व रेखा रावसाहेब खुळे, इतर मागास वर्ग गटातून गणेश कडवे, अनुसूचित जातीजमाती गटातून संतोष आढांगळे व भटक्या विमुक्त जाती जमातीमधून रामनाथ कांदळकर यांची अविरोध निवड झाली होती.
संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सभा निवडणूक अध्यासी अधिकारी आर. बी. त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी संचालक मंडळाने आपापसात बैठक घेत अध्यक्षपदासाठी रामनाथ खुळे व उपाध्यक्षपदासाठी संपत खुळे यांच्या नावावर एकमुखी शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे या दोघांनीच नामनिर्देशन पत्र भरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.