आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञान विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आयआयटीसारख्या दर्जेदार संस्थांमध्येही विद्यार्थी संशोधन करू शकतात. त्यासाठी प्रवेशप्रक्रिया समजावून घेतली पाहिजे. नवीन संशोधनामुळे देशाची अधिकाधिक प्रगती होत जाते, असे प्रतिपादन एसएमबीएसटी महाविद्यालय संगमनेर येथील प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील यांनी केले.
येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘पदव्युत्तर शिक्षणानंतर संशोधनाच्या संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ होते. व्यासपीठावर रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एम. गवारे उपस्थित होते. पाटील म्हणाले की, संशोधनाच्या माध्यमातून आणि अनुभवातून आपण आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करू शकतो. या माध्यमातून आपली वैयक्तिक प्रगती तर होतेच, परंतु देशाच्या प्रगतीलाही हातभार लागतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाच्या भरपूर संधी आपल्याला उपलब्ध आहेत. त्यासाठी हे धोरण समजावून घेण्याबरोबरच पदव्युत्तर शिक्षणानंतर आपल्याला कोणकोणत्या मार्गाने संशोधनाकडे वळता येईल याविषयी विद्यार्थ्यांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. एम. गवारे यांच्यासह सहकार्यांनी केले. या कार्यक्रमाला विज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.