आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वीरश्री प्रतिष्ठानला वैद्यकीय साहित्य भेट; देशमुख परिवाराकडून वॉकर, कमोड चेअर उपलब्ध

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गरजू रुग्णांना घरीच उपचार घेता यावेत यासाठी मोफत वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या वीरश्री प्रतिष्ठानला माजी कृषी पर्यवेक्षक स्व.‌ दिलीप शंकरराव देशमुख यांच्या स्मरणार्थ अमित देशमुख यांच्याकडून ५ बेड, २ वॉटर बेड, व्हिलचेअर, ५ वॉकर, ५ कमोड चेअर वॉकर, ५ कमोड चेअर भेट देण्यात आल्या.

गरजू रुग्णांना मदत व्हावी, त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांनी चार वर्षांपूर्वी वीरश्री प्रतिष्ठानची स्थापना करून गरजूंना वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून दिले. सामाजिक कार्याचा वारसा जपत देशमुख यांनी हे साहित्य उपलब्ध करून दिले.

अमित देशमुख यांनी प्रतिष्ठानला दिलेल्या साहित्यामुळे अजून नव्या वस्तूंची भर पडल्याने रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. अनावश्यक खर्च टाळून त्यांनी संस्थेस या वस्तू देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. कारण या गोष्टी बाजारात विकत घ्यायला गेल्यास महाग असतात, त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण हे साहित्य विकत घेऊ शकत नाही. आणि घेतल्यास या वस्तू काम झाल्यावर पडून राहतात. वीरश्री प्रतिष्ठान या वस्तू रुग्णांना मोफत वापरासाठी देते. आतापर्यंत शेकडो रुग्ण साहित्याचा वापर करून बरे झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...