आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार मेळावा:56 कंपन्यांमधील 2 हजार रिक्त पदांसाठी उद्या मेळावा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटी व मानदंड सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ७ डिसेंबरला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी ५ या दरम्यान गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेळावा पार पडणार आहे. ५६ कंपन्यामध्ये २ हजार रिक्त पदांसाठी हा रोजगार मेळावा होणार असून जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार देवयानी फरादे यांनी पत्रकार परिषदेत केले. मेळाव्यात नामांकित कंपन्या व नियुक्त या दिवशी प्रत्यक्ष मुलाखती घेतील.

स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची महामंडळे यांचे स्टॉल व तेथे कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. अडचण आल्यास ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनीवर संपर्क करावा, असे त्यांनी सांगितले. या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...