आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुसिव्ह:ग्रामीण भागात खासगी लसीकरण केंद्र नसल्याने बुस्टर डोससाठी नाशिक वारी! ; नाशिकला येणे शक्य नसल्याने बहुतेक नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झालेल्या १८ ते ५९ वयोगटांतील नागरिकांना बुस्टर डोससाठी ग्रामीण भागात खासगी लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

गावातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या वयोगटांतील नागरिकांसाठी बुस्टर डोसची व्यवस्था नसल्याने व तालुकास्तरावर खासगी लसीकरण केंद्रही नसल्याने बुस्टर डोससाठी नागरिकांना ‘नाशिक वारी’ करावी लागणार आहे.

‘तुम्ही प्रिकॉशन (बुस्टर) डोससाठी पात्र आहात. खासगी लसीकरण केंद्रावरून तो घेऊन स्वतःला सुरक्षित करा. covin.gov.in या वेबसाइटवर त्यासाठी नोंदणी करा’ अशाप्रकारचे मेसेज कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या नागरिकांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या पोर्टलवरून सध्या येत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेऊन नागरिक स्वतःला सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी विचारणा करत आहेत.

मात्र केवळ ६० वर्षांवरील नागरिक, कोमार्बिड पेशंट आणि फ्रंटलाइन वर्कर यांनाच बुस्टर डोसचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. १८ ते ५९ वयोगटांतील नागरिकांना मात्र बुस्टर डोस विकत घ्यावा लागणार आहे. त्यासाठी २५० रुपये इतकी फी नागरिकांना मोजावी लागणार आहे. ॲपवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर नाशकातील काही खासगी लसीकरण केंद्रांची नावे त्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस घेण्यासाठी नाशिकला येणे शक्य नसल्याने बहुतेक नागरिकांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे.

बातम्या आणखी आहेत...