आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैर लाकूड जप्त:सुरगाण्यात सव्वा लाखाचे खैर लाकूड जप्त; खैर लाकूड व चारचाकी गाडी असा सुमारे एक लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

बोरगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा तालुक्यातील आंबाठा व लोळणी भागात वनविभागाने सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत खैर लाकूड व कारसह सुमारे एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्री ३ वाजेच्या सुमारास एक चारचाकी वाहन (जीजे ०५ सीडी ६१४६) हे संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसून आले. या वाहनाची तपासणी करण्यासाठी वनकर्मचारी गेले असता वाहनातील एक व्यक्ती व आजूबाजूला लपलेले ४ ते ५ व्यक्ती अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून गेले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीची लाकडे दिसून आली. कर्मचाऱ्यांनी हे खैर लाकूड व चारचाकी गाडी असा सुमारे एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपवनसंरक्षक उमेश वावरे व सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ गायकवाड तपास करत आहेत.

कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ गायकवाड, भटू बागूल, रामजी कुवर, तुकाराम चौधरी, हिरामण थविल यांनी भाग घेतला. सुरगाणा तालुक्यात कुठेही वन तस्करी घडत असल्यास तत्काळ १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.